जीवनाची कमाई
तंत्र आणि यंत्रं
गाड्या आणि विमानं
टीव्ही आणि कम्प्युटर
मोबाईल आणि इंटरनेट
माणूस म्हणतो
पहा आम्ही किती केली प्रगती
बागा आणि उद्यानं
टेकड्या आणि मैदानं
हॉटेल्स आणि हॉस्पिटल्समल्टीप्लेक्स आणि मॉल्स
शाळा आणि मंदीरं
गुत्ते आणि स्मशानं
पाहावं तिथं माणसंच माणसं
जमीन सगळी माणसानी लाटली
वनसंपदा संपवून टाकली
वन्य पशु पक्षी लुप्त झाले
क्षुद्र जीव जंतू गुप्त झालेहवेत धुराचं प्रदूषण
नद्यांत गटारींची घाण
शेतांत केमिकल्सचं थैमान
माणसानी सर्वत्र विष कालवलं
विषांनी त्याचंच शरीर पोखरलं
नवनव्या रोगांनी केलं हैराण
माणसाला स्मृतीभ्रंश झाला
आला कुठून जायचं कुठं विसरून गेला
नितीमुल्ये ढासळली
मन भोगात गुंतलं चारित्र्य घसरलं
झाली एवढी गच्छंती
तरी माणूस म्हणतो
पहा आम्ही किती केली उन्नती
मोहनसुत प्रदीप म्हणतो
माणसा का करतोस दंभ येवढा
एके दिवशी मातीत मिळशील
बापाला वर तोंड काय दाखवशील
कर सत्कर्म काहीतरी
घे श्रीहरीचं नाव
तेवढीच जीवनाची कमाई
बाकी व्यर्थ उठाठेव
- प्रदीप अग्रवाल
1 Comments:
good versed Pradipbhai. I would repost it to my FB profile with your kind permission
Post a Comment
<< Home